रविवार, 23 जनवरी 2022

जंगल नोंदी








वनरक्षकाला कोंबलं जंगलात

अन् मारलं मांडी फुटेस्तोवर

लंपास केलं त्याच्या ड्युटीचं साहित्य

'पुन्हा दिसलास तर जीव गमावशील'

या धमक्यांचा आवाज गगणभेदी होतोय

कळते पण वळत नाही

नेमकं जंगल कोण खातोय ??


२. 

साहेब रिकाम्या हाताने आले

जातांना ट्रकभर सामान घेवून गेले.

साहेबाला नसतो कुठलाच नाका आणि टी.पी.

मंगरूने तोडली खाटेसाठी एक सागाची डेर 

अन् तस्कर आरोपात त्याची आरपार बी.पी.


३. 

हा घनदाट रस्ता नेमका कुठे जातो ?

हा कसला आंतरराज्यीय रस्ता ??

गप्प बस्स !

त्या डोंगरापल्याड गेलेला जेसीबी 

डांबरट ट्रॅक्टर अजूनही परतला नाही

सुर्य अस्ताला जाण्यापुर्वी

काळवंडलेल्या धुराने होते लाही लाही.


४.

जीव मुठीत कैद असतो

सांगू शकत नाही फिर्याद

मांगू शकत नाही दाद

सभोवताल विणलयं खब-याचं जाळं

यात अडकलाच कोणी निरपराध

तर हातात बेड्या ठोकतील

किंवा 

नसांतून लाल फव्वारे उडतील.


- अविनाश पोईनकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....