रविवार, 5 जनवरी 2020

धुव्वा कपटांचा व्हावा...

मन मारुन जगावे
घाव सहन करावे
नाही ओळखत कोणी
ज्याला ज्याचं त्याचं ठावे

दारी दुष्काळ असावा
सोस कुणाला नसावा
असे घाम गाळणारा
नाग त्यालाच डसावा

छान पुस्तकं शिकावी
शिवी आपणच खावी
गुन्हे बाकीच्यांना माफ
बाजू सांभाळावी डावी

नातेगोते दोन दिस
तमाश्याचे वाटेकरी
घर भकास करुन
आखतात हिस्सेदोरी

'जात' जाता जात नाही
जातीतून गेले काही
समतेच्या नावाखाली
भरडते लोकशाही

मेहनत करा किती
धुरा हडपते माती
वार सोसतांना होते
गोळी झेलणारी छाती

किती दिस गप्पपणा
बार उडवून द्यावा
ज्याचे त्याने सांभाळावे
धुव्वा कपटांचा व्हावा...


-अविनाश पोईनकर
    ७३८५८६६०५९
=====================

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....