आपले भासणारे लोक
======================
आपण जीव लावत असतो लोकांना
बेंबीच्या देठापासून आपले समजत असतो
पण ते आपले असतात असं काही नाही
जीव लावताना दिसतात तसंही काही नाही
संकटाच्या घडीला चार-दोन दोस्तांशीवाय
आपण नाही मारू शकत कुणाला हाक
आपणच आपल्या धुंदीत जगत असतो
तमाशे पाहणाऱ्यांचा कसला धाक ?
कधी कधी वाटत असतं
अख्ख आभाळ आपलं आहे
पण ओझोन थराला कुरतडणारे
आपलेच लोक असतात उंच.
आपण भांडू शकतो जगाशी
आपल्या भासणाऱ्या लोकांसोबत
ना भांडणाची ना बोलण्याची हिंमत असते आपल्यात.
रोबोट होतो आपला
अपंगत्वासारखं करू शकत नाही आपण काही...
आव्हानांना पेलताना जेवढी दमछाक होत नाही
तेवढा गुलाम होत जातो माणूस परिस्थितीपुढे
उपयोगच वाटत नाही
आपल्या शिक्षणाचा, विचारांचा
फुल्यांच्या सत्यधर्मापासून
तुकडोजींच्या ग्रामगीतेपर्यंतचा.
'जात' नावाच्या जातीला
एवढी चिपकून बसलीय आपली लोक
की आपलाच 'तुकाराम' करायला असतात तयार
आपल्याच माणसातून किती घसरत चाललोय आपण
याची अनुभूती येतेय हळूहळू...
आपले भासणारे लोक किती हुशार असतात
आपलाच करतात गेम आणि ते त्यातले नसतात....
जवळचे भासणारे सोबतीही वाजवतात आपलाच ढोल
आपण निमूटपणे सहन करत राहायचं
सोशिकतेचं झाड होवून.
- अविनाश पोईनकर, चंद्रपूर
७३८५८६६०५९
======================
======================
आपण जीव लावत असतो लोकांना
बेंबीच्या देठापासून आपले समजत असतो
पण ते आपले असतात असं काही नाही
जीव लावताना दिसतात तसंही काही नाही
संकटाच्या घडीला चार-दोन दोस्तांशीवाय
आपण नाही मारू शकत कुणाला हाक
आपणच आपल्या धुंदीत जगत असतो
तमाशे पाहणाऱ्यांचा कसला धाक ?
कधी कधी वाटत असतं
अख्ख आभाळ आपलं आहे
पण ओझोन थराला कुरतडणारे
आपलेच लोक असतात उंच.
आपण भांडू शकतो जगाशी
आपल्या भासणाऱ्या लोकांसोबत
ना भांडणाची ना बोलण्याची हिंमत असते आपल्यात.
रोबोट होतो आपला
अपंगत्वासारखं करू शकत नाही आपण काही...
आव्हानांना पेलताना जेवढी दमछाक होत नाही
तेवढा गुलाम होत जातो माणूस परिस्थितीपुढे
उपयोगच वाटत नाही
आपल्या शिक्षणाचा, विचारांचा
फुल्यांच्या सत्यधर्मापासून
तुकडोजींच्या ग्रामगीतेपर्यंतचा.
'जात' नावाच्या जातीला
एवढी चिपकून बसलीय आपली लोक
की आपलाच 'तुकाराम' करायला असतात तयार
आपल्याच माणसातून किती घसरत चाललोय आपण
याची अनुभूती येतेय हळूहळू...
आपले भासणारे लोक किती हुशार असतात
आपलाच करतात गेम आणि ते त्यातले नसतात....
जवळचे भासणारे सोबतीही वाजवतात आपलाच ढोल
आपण निमूटपणे सहन करत राहायचं
सोशिकतेचं झाड होवून.
- अविनाश पोईनकर, चंद्रपूर
७३८५८६६०५९
======================