शुक्रवार, 30 अप्रैल 2021

कुणा म्हणू माझे ?


आपले-परके |

कळेनासे झाले |

जागोजागी चेले |

दिसताहे ||


तुकारामासाठी |

मंबाजी धाडला |

संभाजी कोंडला |

भामट्यांनी ||


'विश्र्वास' नावाचा |

भरला बाजार |

त्यातही आजार |

अविवेकी ||


घात करताहे |

पेललेले ओझे |

कुणा म्हणू माझे |

जीवलग ? ||


- अविनाश पोईनकर



दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....