रविवार, 23 जनवरी 2022

मानवता








ऋतुंंचे सोहळे

नित्य त्यांच्यासाठी

मेघ आशीर्वाद

उभे त्यांच्यापाठी...


दुबळ्यांचे हात

डोहात तारतो

कोरड्या मनात

निर्मळ झरतो...


झिजली हयात

विचारांची नीती

हातात तेवल्या

अंधारात वाती...


पुण्य आणि पाप

ज्याचे त्याला असो

तुझ्या-माझ्या देही

मानवता वसो...


- अविनाश पोईनकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....