शनिवार, 7 जुलाई 2018

पाऊस



तू हळव्या पानावर
दवबिंदू होवूनी नटतो
तू गुलाब काट्यांचा
पाकळी होवूनी तुटतो...

तू मातीचे मंजूळ गाणे
पाखरांच्या चोचीत दाणा
हे राधेचे रंग बावरले
तू खट्याळ होतसे कान्हा...

तू सृष्टीचे नाते जगतो
जिवलगांची भरवीत शाळा
कधी नयनात येतसे अश्रू
तू पांग फेडते बाळा...

- अविनाश पोईनकर

====================

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....