गुरुवार, 28 जून 2018

आणि शेवटी खरे ठरले...


नेहमीच शहानपणाचे बाँम्ब

त्यांच्या मुखातून फुटत होते..

फुग्यात हवा भरतांना

ते तसेच फुगत होते..



राजकारणाच्या बेताल चर्चा

जगण्याचा डामाडोल

कोण लुटताहेत कुणाला

कोण पिटतोय ढोल..?



आणि

शेवटी खरे ठरले

पोपटपंची

दिवस आले...



क्रांतीच्या तप्त भाषा

बंदुकिच्या धाकाला शरण

एवढाच जगालाय पुरे

तुझं ठिकयं हरलेलं मरण...



-अविनाश पोईनकर / 7385866059




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....