तुझ्या कोमल मनाला
काळजात या विसावा
इंद्रधनूच्या गावात
तारा तुटता दिसावा...
तुझ्या स्वप्नाचं गोंदन
भाळावर उतरावं
तुझ्या मधूर कंठाने
अमृताचं गाणं गावं...
खडतर जींदगीला
मोग-याचा दिला वास
उभ्या देहात नांदते
तुझी आठवन खास....
तुझ्या बोलीत सागर
सत्य स्वाभिमान वाहे
तुकोबाच्या विचाराने
गुंजे कबीराचे दोहे....
हात हातात घेवून
अशी गळाभेट व्हावी
दुष्काळाच्या मौसमात
सर पावसाची यावी...
तुझ्या प्रितीचे चांदणे
आसवांत फुलारले
कर्तुत्वाच्या ओंजळीत
एेश्वर्याचे दान आले...
- अविनाश पोईनकर
====================
काळजात या विसावा
इंद्रधनूच्या गावात
तारा तुटता दिसावा...
तुझ्या स्वप्नाचं गोंदन
भाळावर उतरावं
तुझ्या मधूर कंठाने
अमृताचं गाणं गावं...
खडतर जींदगीला
मोग-याचा दिला वास
उभ्या देहात नांदते
तुझी आठवन खास....
तुझ्या बोलीत सागर
सत्य स्वाभिमान वाहे
तुकोबाच्या विचाराने
गुंजे कबीराचे दोहे....
हात हातात घेवून
अशी गळाभेट व्हावी
दुष्काळाच्या मौसमात
सर पावसाची यावी...
तुझ्या प्रितीचे चांदणे
आसवांत फुलारले
कर्तुत्वाच्या ओंजळीत
एेश्वर्याचे दान आले...
- अविनाश पोईनकर
====================
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें