असा कसा दिस | जन्मा येतो सांग
मायेची ती रांग | वृध्दाश्रम ||
माय आणि बाप | संसाराची चाक
वंदनिय धाक | नाकारला ||
वाढवला जीव | फुटले रे पंख
आकाशाला डंख | टोचलेस ||
तुला लखलाभ | गाडी माडी साडी
जगण्याची गोडी | अर्धवट ||
मदर फादर | तुझे 'डे' सोहळे
वृध्दाश्रम भोळे | हंबरते ||
-अविनाश पोईनकर
=====================
मायेची ती रांग | वृध्दाश्रम ||
माय आणि बाप | संसाराची चाक
वंदनिय धाक | नाकारला ||
वाढवला जीव | फुटले रे पंख
आकाशाला डंख | टोचलेस ||
तुला लखलाभ | गाडी माडी साडी
जगण्याची गोडी | अर्धवट ||
मदर फादर | तुझे 'डे' सोहळे
वृध्दाश्रम भोळे | हंबरते ||
-अविनाश पोईनकर
=====================
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें