मंगलवार, 26 फ़रवरी 2019

मी मरून पडलो तरीही....

मी मरून पडलो तरीही रडण्याचे कारण नाही
त्या उत्सवातही माझ्या का दाराला तोरण नाही ?

हो असेच जगलो जीणे झोपडीच्या आडोश्याला
कुणास ठाऊक माझ्या बसतील कोण उशाला ?

सगळ्यांना निरोप जातील पण येईल कोण जाणे
जीतेपणीच गळली होती ज्यांची त्यांची हिरवे पाने

गर्दी जमेल मोठी अन् चर्चेला पेव फुटतील
भलेबुरे बोलणारे पहा भलेभले गाव दिसतील

मी पुजले कधी कुणाला, का उगा मलाच पुजता
खुप जागलो होतो अता त्रागा कशाला निजता ?

कुणी अंघोळ करून देतील, सकुलीवर सजवतील
कपाळावर ठेवून शिक्का, खांद्यावर उचलतील

मी निपचित पडलो तरीही का हंबरला विसांबा
दुरवरचे काळीज कुणाचे जे बोलत होते थांबा ?

तसा रोजच जळला देह, कायमचा जाळून टाका
शोकसभेत माझ्यासाठी ह्रदयाचा धडकेल ठोका

मी देहाचे चंदन झालो, कोणीही उगाळून पाहील
मातीत मिसळून जाईल कवितेतून उगवून येईल

- अविनाश पोईनकर
  बिबी, जि.चंद्रपूर  / ७३८५८६६०५९
======================

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....